Breakingहट्टी येथे अंगावर भिंत कोसळून वृद्धेचा रहात्या घरातच दबून मृत्यू


सुरगाणा, ता.१३ (दौलत चौधरी) : सुरगाणा तालुक्यातील हट्टी येथे अंगावर रहात्या घराची भिंत कोसळल्याने लक्ष्मी काळू कडाळी (वय ६५) या महिलेचा भिंती खाली दाबल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मी बाई या रात्री जेवण करून झोपल्या होत्या. सकाळ झाली आई घरातून बाहेर का येत नाही हे पाहण्यासाठी मुलगा रतन कडाळी हा घरात गेला असता सदर घटना लक्षात आली.


याबाबत नायब तहसिलदार राजेंद्र मोरे यांनी सांगितले की, १२ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अंगावर भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलिस पाटील मधुकर चौधरी यांनी तात्काळ पोलिसांना कळवून माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर सहारे, महेशं डंबाळे, तानाजी झुरडे, चौरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा