Breakingऔरंगाबाद : भारतीय अस्मिता पार्टी उपाध्यक्षपदी शिवाजी शेळके, तर सचिवपदी बाळू बर्डे यांची नियुक्ती


औरंगाबाद : भारतीय अस्मिता पार्टी उपाध्यक्ष पदी शिवाजी शेळके, तर सचिव पदी बाळू बर्डे यांची नियुक्ती करण्यात आली.   


राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम माव्हारे यांनी झुम मिटींग मध्ये औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष केशव पवार यांच्या सोबत चर्चा करून औरंगाबाद जिल्हात पार्टीचा विस्तार वाढवणे यासाठी या निवडी करण्यात आल्या.

येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार असतील. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी पार्टी काम करेल असेही आश्वासन देण्यात आले.
 
अर्जुन जाधव, लहु गोलवाड, सिताराम गाडे, सुरेश निकम यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करत पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा