Breaking



बीड : जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अर्धनग्न आंदोलन



राज्य सरकार व केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी


बीड / अशोक शेरकर : बीड येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली 8  ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर  अर्धनग्न धरणे आंदोलन करण्यात आले.

मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या पुर्ण न झाल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात शेकापच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली राज्य सरकार आणि केंद्र सरकार दिवसेन दिवस शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना एक प्रकारे आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये तात्काळ मदत करा, एफ आर पी चे तीन तुकडे न करता उसाची एफआरपी एक रक्कमी 14 दिवसाच्या आत द्या, 2020 मधील पिक विमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा. बीड जिल्ह्यातील पाझर तलाव नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील गावांचे पुनर्वसन करा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज व शेतीपंपाचे दोन वर्षांचे विज बील माफ करा, या मागण्या करण्यात आल्या.

या वेळी अॅड नारायण गोले पाटील, अॅड संग्राम तुपे, अर्जुन सोनवणे, भीमराव कुटे नाना पावार, जी. डी. देशमुख, नवनाथ जाधव, अमोल सावंत, प्रशांत चाटे, मुंजाबा पंचाळ, बलभीम भगत, गणेश कदम, सुदाम चव्हाण, विलास मुंडे, बालू इतापे, मुकुंद शिंदे, रईस शेख, मुकुंद खेत्री, अनंत चव्हाण, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा