Breakingब्रेकिंग : ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि तात्काळ जामीन


मुंबई, (ता.१३) : राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. ही कारवाई अत्यंत गुपित ठेवण्यात आली होती. या अटकेनंतर त्यांना काही वेळातच कोर्टाने जामीन दिला.


२०२० मध्ये फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे या तरुणाने केला होता. तसेच, यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही आरोप त्या तरुणाने केला होता. या प्रकरणी आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याच गुन्ह्याअंतर्गत ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती. तसेच, आव्हाड यांना कोर्टासमोर देखील हजर केलं होतं. त्यावेळी कोर्टाने त्यांना १० हजार रुपयांच्या जामिनावर सुटका झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा