Breaking



तांबे गावातील डावखरवाडी येथे ग्रामस्थाच्या वतीने बैलपोळा साजरा


जुन्नर : तांबे गावातील डावखरवाडी येथे ग्रामस्थाच्या वतीने बैलपोळा साजरा करण्यात आला. बैलांची पारंपरिक पद्धतीने सजावट करून ग्रामस्थानी संस्कृतीची जोपासना केली. या कार्यक्रमात ग्रामस्थ, तरुण मुले, महिला भगिनी उपस्थित होत्या. तसेच पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी बैलपोळा पाहण्यासाठी आले होते. बैलांना चौरा, चवार, गोंडे, तोढ तयार करून व विविध प्रकारच्या रंगाणी सजावट करून मंदिराजवळ आणले होते. हा पोळा भाद्रपद पोळा असून जुन्नरच्या पश्चिम पट्यात साजरा केला जातो. त्याचेच उदाहरणं डावखरवाडी होय. श्री.मांजीरबाबा तरुण मित्र मंडळ यांनी बेंजोच्या जल्लोषात बैलपोळा साजरा केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा