Breaking


वडिलांचा ८६ वा वाढदिवस मातृसेवा सेवाभावी संस्थेत अन्नदान करून साजरा


पुणे : पत्रकार भरत बारी यांनी वडिल नारायण बारी यांचा ८६ वा वाढदिवस (१४ ऑक्टोबर २०२१) रोजी मातृसेवा सेवाभावी संस्थेत अन्नदान करून व केक कापून येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी वाढदिवस अन्नदान करून साजरा करीत संस्थेतील वृद्ध व असहाय्य व्यक्तींच्या चेहर्‍यावरील आनंद   द्विगुणित केला. बिजलीनगर, चिंचवड येथील मातृसेवा सेवाभावी संस्था ही अनेक वर्षांपासून वृद्ध व असहाय्य व्यक्तींचे निवासी सेवा केंद्र म्हणून परिचित आहे. "रक्ताच्या नात्याला मायेचा ओलावा देणारी माणसं" या ब्रीद वाक्याप्रमाणे वृद्ध व असहाय्य व्यक्तींची सेवा गोडसे कुटुंबीय मनोभावे करीत आहेत.सुहास गोडसे त्यांच्या पत्नी व मुलगी संस्कृती गोडसे हे कुटुंब मनापासून या संस्थेतील वृद्ध व्यक्तींची सेवा करीत आहेत. या दिवशी बाबांचा ८६ वा वाढदिवस साजरा करताना त्यांचे कुटुंबीय भरत बारी, शारदा बारी, डॉ. आशिष बारी, प्रांजल बारी उपस्थित होते. यावेळी मातृसेवा सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुहास गोडसे व संस्कृती गोडसे यांनी आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्याबद्दल बारी कुटुंबीयांचे आभार मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा