Breakingचाकण : अल्फा इंजिनिअरिंग मध्ये भरघोस वेतनवाढीचा करार


चाकण, ता.५ : चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील अल्फा इंजिनिअरींग प्रा.लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार करण्यात आला आहे. करारावर आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.


■ करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खालील प्रमाणे :


१) १०,००१ (दहा हजार एक) रुपये पगार वाढ

२) कराराचा कालावधी ०१/१२/२०१९ ते ३०/११/२०२२ या तीन वर्षांचा राहील,

३) मेडिक्लेम पॉलीसी ३,००,००० रुपये संपूर्ण खर्च कंपनी करेल

४) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार आणि कंपनीकडून २,००,००० रुपये कायदेशीर वारसास देणार

५) ग्रुप अक्सिडेंट पॉलिसी ५,००,००० रुपये

६) वैयक्तिक कर्ज ६०,००० रुपये

७) पगाराची उचल म्हणून कामगारास त्याच्या पगाराच्या ५०% पर्यंत रक्कम देण्यात येईल

८) सुट्ट्या 

अ) PL - २४१ ते २५९ दिवस भरतील त्यास २० दिवसाला १ राजा व २६० दिवस भरतील त्यास २१ PL मिळतील,

A) आजारपण - ०७

B) किरकोळ - ०७ 

C) PH (PAID HOLIDAY) - १०

D) मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील

९) दिवाळी बोनस :- मार्च महिन्याचा एक ग्रॉस पगार वार्षिक बोनस म्हणून देण्यात येईल

१०) वार्षिक उपस्थिती बक्षीस-A) २६१ - २७० दिवसाला  ७०० रुपये

B) २७१ - २८० दिवसाला १००० रुपये

C) २८१ दिवसांच्या पुढे १,२५१ रुपये

११) बस सुविधा-येलवाडी पासून देहूमार्गे नवीन बस सुविधा सुरू होणार

१२) वार्षिक स्नेह संमेलन यापुढे दरवर्षी घेण्यात येईल

१३) गुणवंत कामगार पुरस्कार :- दरवर्षी १ जणांची निवड करण्यात येईल व सदर कामगारासाठी रुपये ५००१ ची रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येईल,

१४) पाळी भत्ता:- तिसऱ्या पाळीतील कामगारांना ५० रुपये प्रतिदिन पाळी भत्ता म्हणून देण्यात येईल,

१५) कामगारांना कॅन्टीमध्ये वर्तमानपत्र वाचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल

१६) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी २३ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे.


करारावर संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक रघुनाथ मोरे, तेजस बिरदवडे, प्रशांतआप्पा पाडेकर, यूनिट अध्यक्ष किशोर गोरखा,  उपाध्यक्ष योगेश गाढवे, सरचिटणीस महेंद्र लाड, चिटणीस सुदाम गुळवे, खाजिनदार राजेश सिंह,  संघटक योगेश व्येवहारे, गणेश पवार व्यस्थापनाच्या वतीने प्लान्टहेड विनोद टिपरे, एचआर हेड गंगाधर लहाने यांनी सह्या केल्या.


संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी सर्व उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच अध्यक्ष जीवन येळवंडे यांनी प्रास्ताविक केले, व सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. त्यावेळी कामगारांनी पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करुन आनंद व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा