Breakingछावा स्वराज्य सेना आणि अमिगोस स्पोर्ट्स क्लबने घेतलेल्या फुटबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर


पिंपरी चिंचवड : छावा स्वराज्य सेना आणि अमिगोस स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने सॉकर यार्ड, पोतदार शाळेजवळ, चिंचवडगाव येथे घेतलेल्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत के एल सेवन आणि प्लॅनेट एफ सी या दोन संघामध्ये सामना झाला. प्लॅनेट एफ सी ने ०१ असा दमदार विजय मिळवला असून ते पहिल्या बक्षिसाचे मानकरी ठरलेले आहेत.


तीन दिवसाच्या सामन्यात उत्साहाने फुटबॉल प्रेमींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु.८००० आणि चषक/प्लॅनेट एफ सी, संघ, वाकड द्वितीय पारितोषिक रु.४००० आणि चषक, के एल संघ, एफ सी काळेवाडी यांना प्रदान करण्यात आले. यात २४ टिम ने सहभाग घेतला व सर्व सामने रंगतदार झाले.


करोना महामारी विचारात घेता आता पर्यंत सर्व स्पोर्ट्स क्लब बंद होते, तसेच सर्व मैदाने देखील खेळाडूंसाठी बंद होती, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू हे घरी बसून होते. आता करोना महामारी कमी होत असताना परत स्पोर्ट्स क्लब व मैदाने खेळाडूंना खुली होत आहेत तरी या सर्व खेळाडूंना नव्याने पुन्हा एकदा खेळासाठी प्रोत्साहन देण्यासाठी छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य तर्फे फुटबॉल क्षेत्रातील खेळाडूंसाठी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.


या बक्षिस समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे छावा स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष राम घायतिडक -पाटील, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष अरिफ भाई शेख, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर घाडगे, शहराध्यक्ष सौरभ नगर, पुणे शहराध्यक्ष गणेश कांबळे, युवा अध्यक्ष पिंपरी चिंचवड अनिकेत बेळगावकर, व्यापारी संघटनेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष सुशांत जाधव, पिं. चिं. शहर कार्याध्यक्ष अतुल चव्हाण, पिं. चिं. युवा उपाध्यक्ष एजाज शेख, विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष समर्थ नरळकर, किशोर चौधरी, शैलेंद्र पडवळ, सागर खिलारे, शुभम सागर, महेश साळवे, ओंकार गाजरे, निक्सन डोनाल्ड, प्रतीक पडवळ, आर्यन सिंग, ओंकार पडवळ, अथर्व पडवळ, छावा स्वराज्य सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आमिगोस स्पोर्ट्स क्लबचे सर्व खेळाडू उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा