Breakingकोरोना : उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुका अद्यापही आघाडीवर


पुणे / प्रमोद पानसरे : कोरोना बाधित रूग्णांची संख्या जुन्नर तालुक्यात अद्यापही आटोक्यात येताना दिसत नाही. उत्तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्याने कोरोनाच्या बाबतीत आपली घौडदौड कायम ठेवली आहे.


जुन्नर तालुक्यात आजची कोरोना रूग्ण संख्या 67 असून, 564 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर आजअखेर एकूण 673 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. 

आज खेड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या  20 असून, 247 अॅक्टिव्ह रूग्ण असून, आजपर्यंत 582 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.        

आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 11 असून, अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 183, तर आजअखेर 388 रूग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. सदरची आकडेवारी *शनिवार, दिनांक 2 ऑक्टोबर 2021 अखेरची आहे.

अहमदनगर जिल्हा  कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरत आहे. तरी लोकांनी नगर जिल्ह्यात जाताना सतर्कता पाळावी. कृपया सर्वांनीच काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा