Breaking

जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांना जीवे मारण्याची धमकी, 31 डिसेंबर 2021 ही तुझी शेवटची तारीख आहे !जुन्नर, ता. ३१ : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य देवराम लांडे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. हे पत्र पिंपळवंडी येथील शिवसैनिक मंगेश काकडे यांनी पाठवल्याचे समजते आहे. या पत्रावर शिवसेनेचे चिन्ह देखील लावण्यात आले आहे.पत्रात म्हटले आहे की, देवराम तुला आमच्या पक्षाने संधी देवून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिले पण तु शिवसेना पक्षाशी गद्दारी केली. तु शिवसेना पक्षाची बदनामी केली. तुला या पत्राने आम्ही हीच चेतावणी देतो की ज्या आदिवासी जनतेला फसवून तू निवडून आलास त्यास आदिवासी भागात आम्ही तुझा शेवट करणार. येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत निवडणूकीसाठी उभा राहण्यासाठी तू जिवंत राहणार नाहीस याची आम्ही तुला खात्री देतो. ज्या आदिवासी भागात तु फिरतोस त्याच आदिवासी भागात तुझा शेवट करणार. तु एका बापाची औलाद असलास तर आमचा सामना करायला तयार रहा. हाडाचा शिवसैनिक काय असतो ते आम्ही तुला दाखवणार ! 31 डिसेंबर 2021 ही तुझी शेवटची तारीख आहे. आता तु फक्त दिवस मोजत रहा आणि जगून घे. तुझ्याकडे थोडेच दिवस शिल्लक आहेत. 31 डिसेंबर पुर्वी आम्ही तुझा काटा काढणार ! तु कुठंही लपून बसला तरी तुला शोधून तुझा शेवट करणारच ! अशा आशयाचे धमकी पत्र देवराम लांडे यांच्या नावे पाठवण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी देवराम लांडे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 


अधिक वाचा : 

जुन्नर : देवराम लांडे यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत मंगेश काकडे यांनी केला खुलासा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा