Breaking


नाझरा आणि गौडवाडी येथे शेतकरी कामगार पक्षाला जबर धक्का !


सांगोला : शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या चोपडी आणि कोळा गटात प्रस्थापित शेतकरी कामगार पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर जबरदस्त धक्का देत नाझरा व गौडवाडी गावातील असंख्य तरुणांनी शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष माजी आमदार दिपक साळुंखे पाटील यांच्या उपस्थित रविवार दि. 24 रोजी राष्ट्रवादी भवन सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, युवकचे अनिल खटकाळे, राजेंद्र पाटील, बंडू पाटील, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष पांडुरंग पाटील, अनिल जगदाळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.


शेकापमध्ये सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सांगोला तालुक्यातून असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेत आहेत, नाझरा व गौडवाडी येथील तरुणांनीही या प्रवाहात सामील होत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाझरा येथील संभाजी वासुदेव हरिहर, संतोष लक्ष्मण जाधव, सागर किसन वाघमारे, सुशांत शिवाजी ऐवळे रोशन संतोष भोसले आदींसह कार्यकर्त्यांनी दिपक साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यावेळी बसवेश्वर आधाटे, पांडुरंग वाघमारे, सूर्यकांत आधाटे, संजय गोडसे, बंडू मेखले आदी उपस्थित होते तर गौडवाडी येथील बापू अशोक गुळीग, दिलावर इक्बाल मुलानी व ओमकार रामचंद्र हातेकर आदींसह अन्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. 

यावेळी अमोल गुळीग, दयानंद गुळीग, तानाजी कांबळे आदींसह परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा