Breakingदेश बुडविणाऱ्या व शेतकऱ्यांना मारणाऱ्या भाजपला सत्तेवरून हाकलण्यासाठी लाल झेंडा घेऊन संघर्षात उतारा


माकपच्या महागाव तालुका अधिवेशनात कॉ. शंकरराव दानव यांचे आवाहन


महागाव : भाजपचे मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसल्यानंतर खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाचे धोरण राबविण्याच्या सपाटा लावला असून  जनतेचा मालकीचे सर्वच क्षेत्र उदारपणे देशातील भांडवलदारांना देणे सुरू केले आहे. याचाच अर्थ हा देश भांडवलदारांना देण्यासाठी देशातील अन्नदाता शेतकरी यांची शेती घालविणे व देश आपल्या मेहनतीने घडविणाऱ्या कामगाराचे अधिकार नाकारणे आणि ज्यांना आपला देश भविष्यात घडवायचा अहेअश्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे खाजगीकरण करून त्यांना शिक्षणापासून वंचित करणे होय. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मारून टाकणाऱ्या ह्या भाजपच्या मोदीसरकारला सत्तेवरून बेदखल करण्यासाठी लाल झेंडे हातात घेऊन रस्त्यावर येऊन संघर्ष करा, असे जोरकसपणे महागाव येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका अधिवेशनामध्ये कॉ. शंकरराव दानव यांनी आवाहन केले.

दर तीन वर्षांनी होणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिवेशनात गेल्या तीन वर्षातील लेखाजोखा सादर करून नवीन कार्यकारिणी व नवीन सेक्रेटरी निवडल्या जातो. त्यानुसार महागाव तालुक्याचा सेक्रेटरी म्हणून माजी जि. प. सदस्य कॉ. देविदास मोहकर यांची सर्वानुमते निवड करून डी. बी. नाईक,  इसाक भाई, परशराम बरडे, नानाभाऊ पानपट्टे, पांडुरंग मुडे, दयाराम जाधव, रमेश जाधव, एन. एस. तिघलवार, संतोष ठाकरे, बाळासाहेब रनमुले, प्रकाश ढगे, पुष्पा मोहकर, वंदना नाईक व अर्जुन चव्हाण यांची १५ सदस्यीय तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली.

अधिवेशन सुरू करण्यापूर्वी अभिवादन रॅली काढून महागावतील चौकात असणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून त्यांचा जयजयकार करीत अभिवादन करण्यात आले. अधिवेशन स्थळी पक्षाचा लाल झेंड्याला सलामी करून गेल्या तीन वर्षात मृत्यूला सामोरे गेलेल्यांना मौन राखून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

या अधिवेशनाचे उदघाटन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी यांनी करून उदघाटनपर संबोधित केले. यानंतर कॉ. डी. बी. नाईक व कॉ. देविदास मोहकर यांनी अहवाल मांडला. या अहवालावर ७ लोकांनी आपले मत मांडले. यानंतर ५ ठराव पारित करण्यात आले. त्यानंतर ऍड. दिलीप परचाके यांनी जोशपूर्ण भाषण करीत दैदीप्यमान पक्षाचा इतिहास व पक्षाची शिस्त मांडीत शेतकरी, कामगार व सामान्य जनतेच्या होत असलेल्या ससेहोलपटाला मोदी सरकार कसे कारणीभूत आहे, अशी टिका केली. शेवटी कॉ. दानव यांनी वैचारिक मांडणी करीत जनतेची एकजूट करीत संघर्ष वाढविण्याचे आवाहन केले. यावेळेस आशा स्वयंसेविकाच्या जिल्हा सचिव उषा मुरके यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा