Breaking


पुण्यातील एका गोदामाला आग, अग्निशामक दलाची १४ वाहनं दाखलपुणे, ता.२५ : पुण्यातील गंगाधाम येथील एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाची १४ वाहनं दाखल झाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


पुणे शहरातील गंगाधाम चौकातील एका फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून हे गोडाऊन आई माता मंदिराजवळ श्री जी लॉन्स येथे आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची १० वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने आणखी चार गाड्या मागविण्यात आल्या असून, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलातील जवानांकडून सुरु आहे. मात्र, नेमकी आग कशामुळे लागली. हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा