Breaking


मिशन फाॅर व्हिजन फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्नजुन्नर, ता. १४ : जुन्नर नगरपरिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ आयोजित लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर & रिसर्च सेंटर चिंचवड पुणे आणि मिशन फाॅर व्हिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात स्त्री रोग तपासणी, कर्करोग, कान, नाक, घसा, हिमोग्लोबीन, शुगर, बी.पी. तपासणी करण्यात आली. 


तसेच कर्करोग जनजागृती अभियान अंतर्गत उपस्थित महिलांना ऋतुजा गोरडे यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरात एकुण दोनशे महिलांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला संस्थेचे अध्यक्ष सहदेव गोळे, सचिव अंबादास बेळसांगविकर खजिनदार तानाजी कसबे, संचालक डॉ. बीना राजन, सरिता गोळे, सारिका कसबे, डॉ. सारिका शिला वैराट, सुमित्रा गवारी, अशितोष शिरोळीकर, रविंद्र बोरुडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा