Breaking


डीवायएफआय तर्फे पूर्णेत निदर्शनेपूर्णा, ता.२० : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया परभणीच्या वतीने पूर्णेतील भुयारी मार्गाच्या दुरावस्थेविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. संघटनेने म्हंटले आहे की, मागील अनेक महिन्यापासून डीवायएफआय पूर्णेतील नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रेल्वे प्रशासन तसेच तहसीलदार यांना या भुयारी मार्गाच्या समस्येसंदर्भात वारंवार निवेदने देणे, प्रत्यक्ष संपर्क साधने व आंदोलनाचा इशारा देऊनही कुठल्याच प्रशासनाने या समस्येला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे आज या रस्त्यांवरील खड्यात व गुढगाभर पाण्यात थांबून आंदोलन केले. 


काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एक रिक्षा उलटी झाली होती. तसेच एक मोठा टेम्पो देखील रस्त्याखाली उतरला होता. कित्येक दुचाकी वाहनांचा अपघात सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. पूर्णेतील  नागरिकांचा जीव जाण्याची वाट पूर्णेतील सर्वच प्रशासने पाहत आहेत की काय? असा सवाल संघटनेतर्फे करण्यात येत आहे. या रस्त्यावरील समस्या कायमस्वरूपी आठ दिवसात सोडविण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. जर ही समस्या आठ दिवसांत सोडवली गेली नाही तर संघटनेकडून अर्धनग्न आंदोलन, रास्ता रोको करण्यात येईल, त्यानंतरही रस्ता नीट केला नाही तर मजबुरीने रस्ता खणल्याशिवाय पर्याय उरणार नाही असा इशारा डीवायएफआयने दिला आहे. यावेळी नसीर शेख, अमन जोंधळे, सचिन नरनवरे, सोमेश जोंधळे सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा