Breaking
निराधार महिलांना उत्पन्नाच्या योजनांचा आणि प्रशिक्षणाचा लाभ देऊ - प्रा.वैशाली गायकवाड


पिंपरी चिंचवड : विप्ला फौंडेशन आणि एच एस बी सी टेक्नॉलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशनगर, डांगे चौक, थेरगाव येथील प्रज्ञा विद्यामंदिर या शाळेतील करोनामुळे मृत झालेल्या पालकांच्या मुलांना आणि विधवा मातांना किराणा किटचे वितरण संस्थेचे प्रकल्प प्रमुख जैद कापडी व विनोद भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली प्रा.दिपक जाधव यांचे हस्ते करण्यात आले.


यावेळी प्रा.वैशाली गायकवाड यांनी वितरण समारंभाच्या वेळी सांगितले की, शहरातील निराधार, विधवा, महिलांना शासकीय महिला सक्षमीकरणाच्या योजने मार्फत सरकारी अर्थसहाय्य या विधवा मातांना मिळवून देत आहोत, वय वर्षे १८ ते ३० या वयोगतील सर्व गरजू महिला आणि मुलींना संगणक (बीपीओ, रिटेल) आणि अन्य तंत्रविषयक प्रशिक्षण देण्यासाठी शहरात मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये प्रशिक्षणानंतर सरकारमान्य प्रमाणपत्र आणि नोकरी त्यांना देण्यात येईल. अशा कर्ता पुरुष गेलेल्या भगिनीचे सबलीकरण आम्ही करत आहोत.


प्रज्ञा विद्या मंदिरचे संस्थापक प्रा.गोरख गवळी, प्रा.भारती गवळी, संचालक नितीन गवळी, गोरख गवळी, उपमुख्याध्यापिका संगीता कोल्हे यावेळी उपस्थित होते.


यावेळी मुख्याध्यापिका प्रा.प्रज्ञा गवळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षिका आम्रपाली गायकवाड, पूजा खरात, संगीता रोकडे, सुप्रिया तावडे, वैशाली कायापाक, स्वीटी कांबळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा