Breakingजुन्नर : खैरे येथे महिला आणि किशोरवयीन मुलींना "वयात येताना" या विषयावर मार्गदर्शन


जुन्नर, ता.५ : लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर यांच्या संयुक्त माध्यमातून ग्रामीण भागातील खैरे या गावी महिला व किशोरवयीन मुलींना "वयात येताना" या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. शारीरिक बदल, योग्य आहार, मासिक पाळी तसेच घ्यावयाची काळजी याबाबत डॉ.प्रिया कर्डिले आणि डॉ.प्रिया जठार यांनी मार्गदर्शन केले.सर्व विद्यार्थिनी व महीला यांना सॅनिटरी नॅपकीन व मास्कचे वाटप करण्यात आले. प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्षा नंदा शिंदे, सेक्रेटरी भाग्यश्री गोसावी, प्रकल्प समन्वयक प्रीती झगडे यांचे सहकार्य लाभले. यावेळी रुपाली मुत्था, वैशाली भालेकर, अंजली जंगम, श्रेया भोर, नीता देसाई तसेच आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह जुन्नर येथील गृहपाल अर्चना पवार हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा