Breaking


ते मोठे नेते आहेत, त्यांच्या टीकेला उत्तर देण्या इतका मी मोठा नाही - आमदार महेश लांडगे


पिंपरी चिंचवड : पवारसाहेब हे देशातील मोठे नेते आहेत. त्यांच्या टीकेला उत्तर देण्याएवढा मी मोठा नाही, असे विधान आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. मात्र, शहराच्या विकासावर कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत, असे आवाहनही त्यांनी दिले आहे.


शनिवारी (ता.१६ ऑक्टोबर) शरद पवार यांनी भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे महेश लांडगे यांनी शहराची पवना नदीच्या एका बाजूला मी व दुसरीकडे तू अशी वाटणी केली आहे. तसेच त्यांनी दुकानच मांडले नसून मॉलच उभे केले आहे, अशी नाव न घेता म्हणाले होते. त्यावर दोन्ही आमदारांनी सावध भूमिका घेतली आहे.


आमदार लांडगे म्हणाले कि, शहराच्या विकासाबाबत कुणाला शंका असेल, त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी. त्याला उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. तसेच भाजपच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि आमदार लक्ष्मण जगताप पिंपरी-चिंचवड शहर विकासासाठी कटिबद्ध आहोत. खासदार शरद पवारसाहेबांच्या टीकेला उत्तर देण्याइतका मी मोठा नाही. पण, भाजपच्या कार्यकाळाआधी राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात शहराचा जेवढा विकास झाला नाही. तेवढा आम्ही दोघांनी मिळून गेल्या साडेचार वर्षात करून दाखवला. त्याबाबत कोणाच्या मनात शंका असेल, तर त्यांनी समोरासमोर येऊन विचारणा करावी, असे आव्हान भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा