Breaking
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण

Fb - Dilip Walse Patil

मुंबई, ता.२८ : राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय, मॉल, सिनेमागृहे, मंदिरे सुरू करण्यात परवानगी दिली आहे, असे असताना आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

 

 गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे. नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की , त्यांना लक्षणे आढळून आल्यास करोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व करोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा