Breakingजुन्नर येथे युवकांसाठी रोजगार मेळावा संपन्न


जुन्नर : शासनाच्या शिका आणि कमवा या योजनेअंतर्गत बारावी सायन्स व आयटीआय प्रशिक्षण झालेल्या तरुण-तरुणींना नामवंत ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये प्रात्यक्षिक प्रशिक्षण, क्लासरूम ट्रेनिंग सहित विद्यावेतन व डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जुन्नर येथे बुधवारी (दि. ६) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


सदर मेळावा डिसेंट फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. 


कोविड पार्श्वभूमीवर इच्छुक व्यक्तींची मेळाव्यापूर्वीच ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. याप्रसंगी जुन्नर परिसरातील २३५ युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. 


याप्रसंगी एनटीटीएफचे विवेक सिनारे, डिसेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष हितेंद्र गांधी, तुषार लाहोरकर, विनायक कर्पे, प्रोजेक्ट इंचार्ज फकीर आतार, यश मस्करे, दिलीप भगत, आदिनाथ चव्हाण, संदीप ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते. 


निवड झालेल्या तरुण-तरुणींना कोविडची तपासणी करून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथे बोलवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा