Breaking


जुन्नर : वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी ज्वेलर्स व्यापारी, दुकानदार व पोलिस पाटील यांची बैठक संपन्न


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी ज्वेलर्स व्यापारी, दुकानदार व पोलिस पाटील त्याचप्रमाणे महिला दक्षता कमिटी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन आज नारायणगाव पोलिस स्टेशन शिवारातील सभागृहात करण्यात आले होते. त्या अनुषंगाने नारायणगाव पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील दुकानदार, व्यापारी, विविध गांवचे पोलिस पाटील व महिला दक्षता समितीतील महिला पदाधिकारी सदस्या उपस्थित होते.


नारायणगाव व शिवारातील छोट्यामोठ्या चोऱ्यांच्या घटना गेल्या काही दिवसांपूर्वी घडल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्वेलर्स दुकाने फोडण्याचा केलेला प्रयत्न, येथील बसस्थानकाजवळ नव्यानेच सुरू झालेले ज्वेलर्सच्या दुकानाला मागच्या बाजूने भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न नुकताच घडला होता. त्या अनुषंगाने जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांनी ज्वेलर्स दुकानदार,व्यापारी व पत्रकारांची संयुक्त बैठक आयोजित केली. 

यावेळी नारायणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे, नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मार्गदर्शन केले. 

या बैठकीला व्यापारी, ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय चोरडिया, मच्छिंद्र मुंडलिक किशोर महाले, सचिन नागरे, मनिष नागरे, शरद बेलसरकर, भैरवसिंग राजपुरोहित, प्रथमेश जवळेकर, शेखर शेटे, अजित वाजगे आदीसह सराफ व व्यापारी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे महिला दक्षता कमिटीच्या सदस्या वैजयंती कोऱ्हाळे, प्रिती शिंगोटे,सिम्मी शेख, अंजली साठे, प्रगती सोनवणे, रेखा गुंजाळ, लता कुंभार तसेच पोलिस पाटील सुशांत भुजबळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस निरीक्षक विलास देशपांडे यांनी केले. तर आभार सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा