Breakingजुन्नर : रेशनिंगवर खराब धान्य, लोकभारती पक्षाचे तहसीलदारांना निवेदन


जुन्नर / रफिक शेख : जुन्नर तालुक्यातील रेशनिंग दुकानातून लोकांना निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात आहे. त्यामुळे चांगल्या प्रतिचे गहू व तांदूळ पुरवठा करण्यात यावे, अशी मागणी लोकभारती पक्षाच्या वतीने तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदन देतेवेळी लोकभारती पक्षाचे तालुका अध्यक्ष खालिद पटेल, महिला अध्यक्ष छाया उपालकर, शहर अध्यक्षा रीना खरात, उपाध्यक्ष शगुफ्ता इनामदार, किरण उबाडकर आदीसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा