Breaking


जुन्नर : देवराम लांडे यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल !

 


जुन्नर : जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, त्यांचा मुलगा अमोल लांडे यांच्यासह १० जणांवर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

देवराम लांडे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नर तालुक्यातील घाटघर जवळील नाणेघाट येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मोठ्या संख्येने नागरिकांना उपस्थित होते. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देवराम लांडे, अमोल लांडे, यांच्यासह काळू बाळू सरोगदे रा. खडकुंबे, घंगाळदरे गावच्या लेझीम पथकाचे अध्यक्ष, खैरे गावच्या लेझीम पथकाचे अध्यक्ष, भिवाडे गावच्या लेझीम पथकाचे अध्यक्ष, मंडपाचे मालक झंपा लांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे चे प्रवक्ते भाऊ देवाडे, भाजपाचे अजित बांगर, काळू शेळकंदे, राष्ट्रवादीचे सिताराम खिलारी, अजिंक्य घोलप आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


सध्या राज्यभरात कोरोनाचे सावट असल्यामुळे कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस नाईक नवनाथ त्रंबक कोकाटे यांनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा