Breakingजुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी


जुन्नर / शिवाजी लोखंडे : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकांचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी आदिवासी आजी - माजी सरपंच महासंघ जुन्नर तालुका यांच्या वतीने तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यात डोंगराळ व दुर्गमभागात आदिवासी ६५ गांवे असून त्या भागात मध्ये खरीप हंगामात भात हे पिक प्रमुख्याने घेतले जाते. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये अति पाऊस झालेने हाता तोंडाशी आलेने भात पिक निसवण्याच्या तयारीत असताना कडा करपा, खोडकिडा, लष्कर आळी या रोगामुळे आदिवासी भागातील भात पिक उत्पनामध्ये ४० ते ५० टक्के घट होण्याची दाट शक्याता आहे. काही प्रमाणात भाताच्या लोंब्या व आलेले दाणे पावसामुळे कुंजून काळे पडलेले आहे. 

त्यामुळे मंडलाधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी पोपट रावते यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा