Breaking


जुन्नर : अतिक्रमण आणि अतिक्रमण धारकांनी कोंडलाय नारायणगावच्या रस्त्यांचा श्वास ! कारभाऱ्याचा धाक आहे की नाही ?


नारायणगाव / रवींद्र कोल्हे : "नारायणगाव बस स्थानक ते पूर्व वेश" रस्त्याच्या दुतर्फा दुकानं पथारीवाले आणि दुसऱ्या मार्केटचं जाळं. यामध्ये  मुक्ताई(शिंदे), नंदराम शेषमल मुथ्था (मुथ्था ) आणि अशोका शॉपिंग सेंटर (मिनी )मार्केट या तीन मार्केटचे जाळं असल्याने वाहनांची गर्दी,  त्यातच रहदारीच्या रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग त्याचप्रमाणे दुतर्फा असलेल्या पादचारी मार्गावरील दुकानदार यामुळे या रोडवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी त्यातून होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. त्यामुळं नारायणगाव शहरातील प्रवेशद्वार असलेल्या रस्त्यावरचा श्वास अक्षरशः कोंडला आहे.


ही बाब गावचे कारभारी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवर दुकानदारांना, व पथारीवर धारकांना समज दिली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उभा उलट गाव कारभारी यांचा धाक म्हणा की वचक असा राहिला नाही. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पूर्व वेशिजवळ आणि वेशातील मार्गावर काही पथारीवाले आपलं दुकान लावून व्यवसाय करतात. मात्र वेशीबाहेर काही दुकानदार आपल्या दुकानांपुढे कॅरेट लावून रस्त्यावर दुकानं थाटतात ! त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गर्दी होते. पायी चालणंही कठीण होत आहे. जेष्ठ नागरीक आणि महिलांना या अतिक्रमण धरकांचा त्रास होत आहे. या रोडवर अतिक्रमण वाढल्याने, जुन्नर रोडवरील बांधकाम ही राजरोसपणे सुरू आहेत.
नारायणगावच्या या बकाल पणाकडे कारभारी लक्ष देतील का ? असा सवाल केला जात आहे.

जुन्नर रोडवरील वाढते अतिक्रमणांना कोणाचा आशिर्वाद आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असला तरी बांधकामं करतांना नारायणगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, जबाबदार व्यक्ती अतिक्रमण धारकांना जाब विचारू शकत नाही का ? हा सर्व सामन्यांना पडलेला प्रश्न उपस्थित झाला आहे.

काहीही असो नारायणगावकर एका बाजूला नगर पंचायतीची आशा बाळगून आहेत. तर एका बाजूला अतिक्रमण करून रस्त्यांचा श्वास कोंडू पहात आहे. मग नगर पालिका होईल का ? एका बाजूला कारभाऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तर एका बाजूला बाहेरगावाहून येथे व्यवसाय करायला आलेल्या व्यवसायिकांना गावचं काहीही घेणं देणं नाही. त्यामुळे ते अतिक्रमण करून व्यवसाय करतात. मात्र याचा त्रास स्थानिक संस्थांवर व स्थानिक नागरिकांना होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा