Home
ग्रामीण
जुन्नर
जुन्नर : दिव्यांगांच्या प्रश्नांना घेऊन प्रहारचे गौरव जाधव यांचे जुन्नर ला भेट !
जुन्नर : दिव्यांगांच्या प्रश्नांना घेऊन प्रहारचे गौरव जाधव यांचे जुन्नर ला भेट !
जुन्नर : दिनांक 18 ऑक्टोबर 2021 रोजी जुन्नर तालुक्यात राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य समन्वयक गौरव जाधव यांनी भेट दिली. जुन्नर तालुक्यातील विषयावर चर्चा करण्यात आली.
यामध्ये तालुक्यातील व जुन्नर नगर पालिका हद्दीतील बेघर लोकांना व दिव्यांग लोकांना व झोपडपट्टीत लोकांना आहेत. त्या ठिकाणी घरकुल व पुनर्वसन होणे, दिव्यांग लोकांना 5 % निधी तसेच 2019 पासूनचे जिल्हा परिषद कडून उदरनिर्वाह भत्ता व दुर्धर आजार याची पैसै दिव्यांग लोकांना पैसे बॅकेत जमा होणे, दिव्यांग लोकांना स्टाॅल व मोफत साहित्य वाटप व ऑनलाईन प्रमाण पत्र तपासणी जुन्नर ग्रामीण रूग्णालयात सुरू करणे व तालुका ठिकाणी दिव्यांग भवन होणे, बेरोजगारांना तालुका ठिकाणी रोजगार सुरू करावा व रोजगार मेळावा घ्यावा, लेण्याद्री कोवीड सेंटर येथील सफाई कामगारांना मागिल 9 महिन्यापासून चा थकीत पगार मिळणे, वाढीव बिज बिले कोरोना कोवीड या काळात बिज बिले माफ होणे, मुलांना शाळेच्या फी माफ होणे व मुलांचे शिष्यवृती मिळणे बाबत व इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षचे योगेश राऊत, जिल्हा उपाध्यक्ष, मंगेश ढमाळ, दिपक काळे, शरद गरकळ, गणेश बोंबे, जुन्नर तालुका अध्यक्ष दिपक चव्हाण, अरूण शेरकर, राहुल मुसळे, सुनील जंगम, स्वप्निल लांडे, सौरभ मातेले, कार्याध्यक्ष लोखंडे, शेख अहमद इनामदार, मंगेश भुजबळ, अनसार सौदागर, ज्ञानदेव बांगर, खालीद गोलंदाज, महेश बोचरे, विवेक गलोहत, अनंत हाडवले, अजिज पठाण, सुचित रोकडे व प्रहार रूग्ण सेवक व कार्यकर्ता उपस्थित होते.
या वेळी जुन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाची जबाबदारी पुन्हा प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केन्द्र महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण याची पुन्हा प्रहार जनशक्ती पक्ष तालुका जुन्नर ची जबाबदारी देण्यात आली. या वेळी गौरव जाधव यांनी व सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी अध्यक्षांना अभिनंदन व हार्दीक शुभेच्छा दिल्या.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा