Breakingलखीमपूर घटनेच्या निषेधार्ह, जुन्नर बंद राहणार ? पहा आमदार अतुल बेनके काय म्हणाले !


जुन्नर, ता.९ : उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यात ४ शेतकऱ्यांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यात हा बंद शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.


तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून या बंद मध्ये जीवनावश्यक गोष्टींची दुकाने वगळण्यात आली आहेत त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, विघ्नहर सहकारी साखर कारखाना, सर्व मेडिकल्स, हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये यांनाही यातून वगळण्यात आले आहे. अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी पत्रकार परिषदेत दिली.


तसेच, तालुक्यातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उत्तर प्रदेश मध्ये मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी या बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.


या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, सभापती संजयराव काळे, शरदराव लेंडे, सत्यशील शेरकर, अंकुश आमले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप, सभापती विशाल तांबे, राजश्री बोरकर यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा