Breaking


जुन्नर : ग्रामपंचायत आंबे येथे मनरेगा अंतर्गत रस्त्याच्या कामाचे उद्घाटनजुन्नर : आंबे येथील माळवाडी बस स्टँड ते पाटीचा कुरुळ रस्त्याचे काम आज सुरू करण्यात आले. हे काम ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्या अंतर्गत ४०० मी करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे आज उद्घाटन करण्यात आले.


या कामाच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, ग्रामसेवक लहू भलिंगे, ग्रामपंचायत सदस्या लता किर्वे, गोविंद रेंगडे तसेच रोजगार सेवक संदीप शेळकंदे, पोपट हेमाडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी ग्रामसेवक लहू भलिंगे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत किती कामे सेल्पवर आहेत याचा आढावा घेत सध्या २५ मजुरांना काम मिळाल्याची माहिती दिली, तसेच रोजगार हमीचे काम कसे करावे, काम किती केल्याने किती रोज मिळतो या बद्दल माहिती दिली. त्यावेळी सरपंच मुकुंद घोडे यांनी, आपण मोठ्या प्रमाणात कामे मंजूर करून घेऊ आणि एकही व्यक्ती कामासाठी बाहेर न जाता त्या व्यक्तीला गावामध्येच कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करू असा विश्वास दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा