Breakingजुन्नर : एसटी बसचा लपंडाव सुरुच; विद्यार्थी, प्रवाशांना नाहक मनस्ताप !जुन्नर : जुन्नर - अंजनावळे ही दुपारी ३ : १५  वाजता जाणारी बस सलग दुसऱ्या दिवशी प्रशासनाने रद्द केल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.


सकाळी बसेस येतात, प्रवासी गावाकडून तालुक्याच्या ठिकाणी येतात. परंतु अचानकपणे बस फेऱ्या रद्द केल्या जात आहेत. याचा त्रास गेल्या दोन दिवसांपासून अंजनावळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या शाळा, महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांनी बस पास काढले, परंतु बस रद्द होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. तसेच बस स्थानकात विचारणा केली असता आगार मधून बस आली नाही किंवा डिझेल संपल्याचे सांगण्यात येते. १० व १२ तारखेलाही अचानक बस फेरी रद्द केल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

त्यामुळे पास असूनही खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असेल तर पासचा काय उपयोग असा संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा