Breakingजुन्नर : लोकल क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, गुटखा वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा माल जप्त


नारायणगाव (रवींद्र कोल्हे) : "स्थानिक गुन्हे शाखा अर्थात लोकल क्राईम ब्रँच (LCB) चे पोलिस खेड आणि जुन्नर तालुक्यात गस्ती"वर (पेट्रोलिंग) करत असतांना ४ लाख ७४ हजार ७८०/- रुपयांचा गुटका जप्त केला आहे.


पोलिसांना गोपनीय बातमीदारकडून माहिती मिळाली की, जुन्नर मधील "हॉटेल सिबाका" जवळ एका "मारुती सुजुकी सुपर कॅरी" गाडीत एक इसम गुटका वाहतूक करीत आहे. खबर पक्की असल्याची खात्री करून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती कळविली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोकल क्राईम ब्रँच"ने साफळा लावला. तेथे मिळालेली माहिती पक्की असल्याने सावज जाळ्यात वाहन चालक मनोज बाळशीराम वाणी (वय २९ रा.पिंपळगाव तर्फे नारायणगाव, ता.जुन्नर,जि.पुणे) यांस अटक केली असून, त्याच्या गाडीतील ४ लाख ७४ हजार ७८०/- रुपयांचा गुटका जप्त केला असल्याची माहिती लोकल क्राईम ब्रँच"चे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली.


याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार (दि.९ ऑक्टोबर) रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पथक खेड जुन्नर विभागात पेट्रोलिंग करीत असतांना सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांना गोपनीय बातमीदारकडून बातमी मिळाली. की एकनाथ वाडी ता.जुन्नर शिवारात "हॉटेल सिबाका जवळ" मारुती सुझुकी "सुपर कॅरी" या वाहनातून एक जण गुटका वाहतूक करीत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री झाल्यावर आपल्या वरिष्ठांना याची माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शिवारात एकनाथ वाडी येथे साफळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण आपल्या चारचाकी वाहन क्र.एम.एच.१४ जे एल ०४२२ या वाहनाची पंचां संमक्ष पाहणी केली असता त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तंबाखूयुक्त, पान मसाला यात वापरणारा गुटका आढळला आहे. सदर आरोपी मनोज वाणी याच्या ताब्यातून गुटका पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलिसांनी जुन्नर पोलिसांच्या ताब्यात वाहन दिले आहे.


सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पो.ह.दीपक साबळे, विक्रम तापकीर, पो.ना.संदीप वारे, पो.शी.अक्षय नवले, पो.शी.निलेश सुपेकर, पो.मित्र प्रसाद पिंगळे आदींनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा