Breaking


जुन्नर : देवराम लांडे यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत मंगेश काकडे यांनी केला खुलासा


जुन्नर, ता. ३१ : जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांना काल ३० ऑक्टोबर रोजी मंगेश काकडे यांच्या नावे धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. यावरून तालुक्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या पत्रा संदर्भात मंगेश काकडे खुलासा केला आहे.


माध्यमांशी बोलताना मंगेश काकडे म्हणाले की, "आमच्या परिसरात मंगेश काकडे नावाचे चार पाच लोक आहेत. लांडे साहेब आणि आमच्यामध्ये कोणतेही वैर नाही, तसा संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या बद्दल वाईट बोलण्याचा विषय नाही. आपली ही शिवजन्मभूमी आहे त्यामुळे असा प्रकार सहन केला जाणार नाही. माझी पोलीस खात्याला विनंती आहे की, या पत्राची सखोल चौकशी करावी, हे ज्याने कुणी केलं आहे त्याला शिक्षा करावी", असे मंगेश काकडे म्हणाले आहेत. 


अधिक वाचा : 

जुन्नर : जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांना जीवे मारण्याची धमकी, 31 डिसेंबर 2021 ही तुझी शेवटची तारीख आहे !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा