Breakingजुन्नर : मुस्लीम धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या अटकेचा निषेध, तहसीलदारांद्वारे राष्ट्रपतींना निवेदन


जुन्नर / रफिक शेख : मुस्लीम धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी यांना अटक केल्याचा जुन्नर तालुका ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादे मुस्लीमीन पक्षाने निषेध केला आहे. तसेच तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.


मुस्लीम समाजाचे धर्मगुरु मौलाना कलीम सिद्दीकी हे मुस्लीम समाजाचे मोठे धर्मगुरु आहेत. त्यांना उत्तरप्रदेश ए.टी.एस. ने अटक केली आहे. 

कोणतेही कारण नसताना अवैध्य धर्मातराचे खोटे आरोप लावून अटक केली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. तसेच संपुर्ण मुस्लीम समाजाचे भावना दुखावले असल्याचे म्हटले आहे. 

या कारवाईचा जुन्नर तालुका ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादे मुस्लीमीन व जुन्नर शहर मुस्लीम समाजाने निषेध केला आहे. 

यावेळी जुन्नर तालुका अध्यक्ष रफिक अहेमद सुभेदार, रउफ खान, अहमद बेग, मनानं कुरेशी आदीसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा