Breaking


जुन्नर ते अंजनावळे बस रद्द, प्रवाश्यांची रात्रीच्या वेळी पायपीटजुन्नर, ता.३० : जुन्नर ते अंजनावळे मुक्कामी बस आज ३० ऑक्टोबर पुन्हा अचानक रद्द करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. या अगोदर देखील अनेकदा पश्चिम भागातील बस रद्द करण्यात आल्या आहेत.


गेल्या काही दिवसांपुर्वीही दुपारी दोन वाजता सुटणारी जुन्नर ते अंजनावळे बस रद्द करण्यात आली होती. नारायणगाव बस आगारातून बस आली नाही किंवा डिझेल संपल्याची सबब दिली जाते. मात्र, अंजनावळे हि आदिवासी भागातील शेवटच गाव असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होते. विद्यार्थ्यांनी पास काढले आहेत मात्र नाईलाजाने खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.


आज अचानक जुन्नर ते अंजनावळे बस रद्द केल्याने घाटघर, अंजनावळे येथील नागरिकांनी रात्री शिरूर जळवंडी बस प्रवास करून पुढे ३ ते ४ किलोमीटर रात्रीच्या वेळी पायी प्रवास करावा लागल्याने प्रवाश्यांनी संताप व्यक्त केला.


दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे हे देखील जुन्नर बस स्थानकात दाखल झाले होते, त्यांनी प्रवाश्यांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा