Breakingजुन्नर : विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान !
जुन्नर : नारायणगाव येथील शिवारातील बोरपट्टा परिसरातील सुरेखा वसंत खैरे यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना उघडकीस आली.शेतकरी बालाजी घोलप विहिरीजवळून जात असताना त्यांना बिबट्याच्या डरकाळ्यांंचा आवाज आला, ही माहिती समजताच त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली.

वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्यासह माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे अधिकारी डॉ. निखिल बंडगर यांच्यासह बिबट्या रेस्क्यू टीमचे सदस्य व वनाधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.


दरम्यान कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीमध्ये पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तत्पूर्वी बिबट्याला विहिरीमध्ये पडल्याची खबर परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर स्थानिक शेतकरी ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेत मोठी गर्दी केली होती.

सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याला वन विभागाचे कर्मचारी व बिबट्या रेस्क्यू टीमने शिताफीने बिबट्याला बाहेर काढले. त्यानंतर माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले‌.

या रेस्क्यू मध्ये वनक्षेत्रपाल अजित शिंदे, डॉ. निखिल बंडगर, महेंद्र ढोरे, वनपाल नितीन विधाटे, नारायण राठोड, स्वरूप रेंगडे, निलेश विरणक, संजय गायकवाड, व वन कर्मचारी खंडू भुजबळ, पंढरीनाथ भालेकर, बाबु नेहरकर आदीसह सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा