Breakingजुन्नर : शाळेची घंटा वाजली, पहिल्याच दिवशी पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांची शाळेला भेट !


जुन्नर : कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. शासनाच्या आदेशानुसार आज 4 ऑक्टोबर पासून ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत व शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत वर्ग सुरू झाले आहेत. 


शाळेच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर नंबर १ ला भेट दिली. तसेच यावेळी शाळा आणि शालेय परिसराची देखील त्यांनी पहाणी केली.

यावेळी शाळेच्या वतीने काळू गागरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गागरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्क वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.

यावेळी केंद्रप्रमुख भांगे, किसन केदारी, तसेच शिक्षक बाळासाहेब मोरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मेघा बावबंदे, अलका बगाड यांनी नियोजन केले. तर शारदा भोर यांनी आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा