Breakingजुन्नर : केळी माणकेश्वर येथून जनावरांचे लसीकरण मोहिमेस सुरुवात


जुन्नर, दि.२ : आज केळी माणकेश्वर या ठिकाणी जुन्नर पंचायत समिती सदस्य काळू गागरे यांच्या उपस्थितीमध्ये लाळ खुरकूत लस जनावरांना देऊन लसीकरण मोहीमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी शेजवळ, डॉ. डोळस उपस्थित होते.जनावरांना लाळ खुरकूतचा आजचा प्रादुर्भाव दिसत असल्याने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.


याप्रसंगी केळी गावचे पोलीस पाटील पंढरीनाथ लांडे तसेच उपसरपंच चिंतामण लांडे, गणपत लांडे, विठ्ठल ताजणे, बबन लांडे, मारुती लांडे, बाळु लांडे, किसन लांडे, रमेश लांडे, दिगंबर लांडे, रोहिदास लांडे तसेच  अंजनावळे गावचे उपसरपंच युवराज लांडे, सामाजिक कार्यकर्ते शरद हिले व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा