Breakingलखीमपुर उत्तर प्रदेश येथील घटनेच्या निषेधार्थ चांदवडला महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद


चांदवड (सुनिल सोनवणे) : उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या वेळी जो हिंसाचार झाला या घटनेचा आणि केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा निषेध म्हणून चांदवड येथे सोमवार असूनही सोमवारचा बाजार पूर्णपणे बंद होता. रेणुका कॉम्प्लेक्स मार्केट 'यार्ड कॉम्प्लेक्स' व गावात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवलेली होती.


महाविकास आघाडीच्या पक्षांनी संयुक्तपणे आवाहन केल्यामुळे चांदवडकरांनी बंदला समिश्र प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मित्र पक्ष या तालुक्यातील पक्षांचे प्रमुख व असंख्य कार्यकर्ते आवाहन करताना दिसले. यात चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष कोतवाल, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. सयाजीराव गायकवाड, खंडेराव आहेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, विजय जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश शेळके, शिवसेनेचे शहराध्यक्ष भावडू उगले, नगरसेवक नवनाथ आहेर, सुनील कबाडे, रघुनाथ आहेर, यु के आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय गांगुर्डे, शैलेश ठाकरे, सुधीर कबाडे, रौनक कबाडे, तुकाराम सोनवणे, दत्ता वाघचौरे, घमाजीराजे सोनवणे, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, किसान सभेचे तालुकाध्यक्ष अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, रिजवान घाशी, सुखदेव केदारे, भास्करराव शिंदे, लक्ष्मण आहेर,  हनुमंता गुंजाळ, माकपचे तालुकाध्यक्ष शब्बीर सय्यद, दत्ता वाकचौरे, अनिल पाटील भोकनळ, शंभू खैरे, प्रसाद प्रजापत, दिपक शिरसाट, अॅड.विनायक हांडगे, गुड्डू खैरणार तसेच इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळेस तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. चांदवडचे पोलीस निरीक्षक समिर बारवकर, एपीआय जाधव, पीएसआय राठोड, पुणे राखीव पोलीस दलचे पीएसआय राजेश बुधावले तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा