Breaking


मावळ : नव रणरागिणीच्या कर्तुत्वाचे स्मरण करून महिलांचा दांडिया उत्सव साजरा !


मावळ : अखिल भारतीय जनवादी महिला संघटना शाखा सुदवडी तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने नव रणरागिणीच्या कर्तुत्वाचे स्मरण करून सुदवडी शाखेच्या महिलांनी आगळावेगळा दांडिया उत्सव साजरा केला.


यामध्ये रणरागिनी महिला बचत गट व स्वाभिमानी महिला बचत गटाच्या सर्व महिलांनी नऊ दिवस सांस्कृतिक मनोरंजन आणि नऊ रणरागिनी च्या कार्याचा आढावा घेतला व दसऱ्याच्या दिवशी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुदवडी गावच्या सरपंच रंजनाताई शेंडे या उपस्थित होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट वृंदावनी चाटे यांनी सांगितला. नताशा दराडे हिने रजिया सुलतान यांच्या कार्याचा आढावा घेतला. माता जिजाबाई यांच्या कार्याचा आढावा सुप्रिया जगदाळे यांनी घेतला. तसेच अपर्णा दराडे यांनी अहिल्याताई रांगणेकर, गोदूताई परुळेकर, ताराबाई शिंदे कॅप्टन लक्ष्मी सहगल, अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा आढावा घेतला.

दरवर्षी 9 कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा जागर व दांडिया उत्सव करण्याचे जाहीर केले. व अहिल्याताई रांगणेकर ब्रिगेड च्या शाखेची स्थापना केली. मावळ तालुक्यातील महिलांवरील अन्याय अत्याचार यासाठी लढा देण्याचे आश्वासन महिलांना देण्यात आले. यावेळी सुदवडी गावच्या सरपंच यांना रस्ते नळ योजना लाईट घंटागाडी संदर्भात सुधवडी शाखेच्या महिलांनी निवेदन दिले.

या कार्यक्रमाचे संयोजन भारती पाटील, छाया पाटील, कल्पना पाटील, सुप्रिया जगदाळे, ज्योती काळे, सुप्रिया शिंगटे, शारदा बरगंडी, भाग्यश्री उडगी, संगीता उजागरे, योगिता भामरे, अंजली दास, पार्वती सूर्यवंशी, शीतल जाधव, अनिता खरे यांनी केले. 

यावेळी चंद्रकांत जाधव, महादेव सुरवसे, दौलत शिंगटे, पावसू करे, दीपक राजगुरू, मारुती चाटे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा