Breaking


चांदवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्नचांदवड (सुनील सोनवणे) : चांदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चांदवड येथे मार्केट कमिटी सेल हॉल मध्ये भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.


यावेळेस जिल्हा संघटक रघुनाथ आहेर, शहराध्यक्ष प्रकाश शेळके, राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे कार्याध्यक्ष विजय गांगुर्डे यांनी प्रथम रक्तदान करून कार्यक्रमाची रक्तदान शिबिराची सुरुवात केली. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व समता परिषदेचे कार्यकर्ते रक्तदानासाठी उपस्थित होते. 


संबधित व्हिडीओ पाहण्यासाठी खाली क्लिक करा.


यावेळी रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व समता परिषदेचे तालुक्यातील नेते व कार्यकर्ते मार्केट कमिटी सेल हॉल येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष उत्तम आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी विजय जाधव, ज्येष्ठ नेते सुनील कबाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या भारती देशमुख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष दत्तू वाकचौरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विजू नाना गांगुर्डे, जिल्हा संघटक रघुनाथ आहेर, समता परिषदेचे जिल्हा सेक्रेटरी सतीश सोनवणे, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ.दिलीप शिंदे, चांदवड तालुका संघटक ज्ञानेश्वर काळे, नगरसेवक नवनाथ आहेर, रिजवान घासी, चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, मतीन घासी, रोनक कबाडे, तुकाराम सोनवणे, सुधीर कबाडे तसेच तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा