Breakingनांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सातवे शहर अधिवेशन संपन्न, कॉ.गंगाधर गायकवाड यांची सचिवपदी फेर निवड


नांदेड : ३० सप्टेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ७ वे नांदेड शहर अधिवेशन शहरातील गांधी नगर येथे जल्लोषात संपन्न झाले असून शहर समितीच्या नूतन सदस्य पदी एकूण सात जनांची समिती गठीत करण्यात आली असून शहर समिती मध्ये कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.अरुण दगडू, कॉ.मारोती केंद्रे, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.बंटी वाघमारे,कॉ.शेख मगदूम पाशा आदींची निवड अधिवेशनामध्ये करण्यात आली.


निवडून आलेल्या समितीने सचिव म्हणून गंगाधर गायकवाड यांची एकमताने फेर निवड केली आहे. 

अधिवेशनाला उदघाटक म्हणून माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जून आडे हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षाचे जिल्हा समिती सभासद  किशोर पवार, प्रल्हाद चव्हाण आणि सीटू राज्य सचिव उज्वला पडलवार हे होते.

खुल्या सत्रासाठी आग्रहाचे निमंत्रण सर्व सामान्य जनतेला देण्यात आले होते.कॉ.विजय गाभणे व अर्जून आडे यांनी अधिवेशनास संबोधित केले असून आगामी काळात आणखी जोमाने लढा तीव्र करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष कटीबद्ध असेल असे आवाहन केले.

अधिवेशनात अध्यक्षीय मंडळामध्ये उज्वला पडलवार, अरुण दगडू व संगीता गाभणे यांची नावे निश्चित करून पुढील कामकाज  त्यांनी योग्यरित्या पार पाडले. अधिवेशनात पक्ष सचिव गंगाधर गायकवाड यांनी मागील तीन वर्षाचा आढावा अहवालात मांडला असून त्या अहवालास सर्व प्रतिनिधींनी एक मतांनी पाठिंबा देत आहवाल मान्य करण्यात आला.

अधिवेशनास शुभेच्छा देण्यासाठी भाकप युनायटेडचे इरवंत सुर्याकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस गणेश तादलापूरकर व कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत आसमाने यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. 

अधिवेशनात तीन ठराव मांडण्यात आले असून अरुण दगडू यांनी वाढती महागाई व भांडवलदारांना देण्यात येणारी सूट हा ठराव मांडला. उज्वला पडलवार यांनी महिला व दलित अत्याचार विरोधी ठराव मांडला तसेच बंटी वाघमारे यांनी कोरोना महामारी व सार्वजनिक मालमत्तेची विक्री हा ठराव मांडला सर्व ठराव अधिवेशनात एक मताने पास करण्यात आले आहेत.

अधिवेशनात एकूण सतरा प्रतिनिधी हजर होते.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रविन्द्र जाधव, महमद रफिक म.पाशा, जयराज गायकवाड, सचिन आंबटवार, लता गायकवाड, सुंदरबाई वाहुळकर, कमलबाई वाघमारे, सचिन वाहुळकर, गजानन गायकवाड, विशाल गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

सचिव पदाची जबाबदारी  कॉ.गंगाधर गायकवाड यांनी घेतल्यानंतर त्यांनी आक्रमकपणे मनोगत व्यक्त केले व पुढील काळात पक्षाच्या वतीने अन्याय,अत्याचार झालेल्या व पिडित लोकांना मदत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल व कामगार व कष्टक-यांचे लढे आणखी जोमाने लढावे लागतील व शहर समिती हे नक्कीच करेल असा विश्वास व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा