Breakingनाशिक : आशाना जिल्हा रुग्णालयात अपमानास्पद वागणूक दिल्या आरोप, आयटक संघटना आक्रमक


नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशा स्वयंसेवकांना जिल्हा रुग्णालयात अपमानास्पद वागणूक दिला जात असल्याचा आरोप करत आयटक संलग्न महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक संघटनेने निषेध केला आहे. तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या  नाशिक जिल्ह्यात 4000 वर कार्यरत आहेत. बाल मृत्यू रोखण्यासाठी, लसीकरण, विविध आरोग्य चे काम अल्प मानधन वर करतात. ग्रामीण तसेच शहरी भागात स्रियांचे प्रसूती  दवाखान्यात व्हावी. माता मृत्यू, बाल मृत्यू रोखण्यासाठी आशा 24 तास कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यात प्रसूतीसाठी महिलांना शासकीय रुग्णालयात आशा घेऊन येतात. मात्र रुग्णालयातील कर्मचारी आशा ना अपमानास्पद वागणूक दिली जाते. रुग्ण समक्ष अपमान केल्यामुळे आशा चे मनोधैर्य खचित होत आहे, असेही म्हटले आहे.

दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सिन्नर तालुक्यातील आशा स्वयंसेवका लता सोनवणे प्रसूती साठी महिला सोबत आल्यावर सकाळी 8:15 शालिनी रेसिडेंऐंशी यांनी अपमानास्पद वागणूक दिली. वाईट पध्दतीने बोलल्या समोर रुग्ण होते. या घटनेचा आयटक सलग्न आशा व गट प्रवर्तक संघटना वतीने निषेध केला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, रात्री अपरात्री आशा आपल्या लहान मुलांना सोडून रुग्णा सोबत येतात. त्यांना प्रसूती होईपर्यंत थांबवले जाते. त्या शिवाय सह्या दिल्या जात नाही. ऍडमिट केल्यावर त्यांना त्वरित सह्या देण्यात याव्यात. तसेच आशांना थांबण्यासाठी' आशा निवारा केंद्र' कमीत कमी 2 रूम असाव्यात. कोरोना योध्या आशा ना जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण रुग्णालयात सन्मानाची वागणूक मिळावी. रुग्णालयात कर्मचाऱ्यांना नावाची प्लेट लावण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रश्नी त्वरित न्याय मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा