Breakingनाशिक : हक्काच्या जमिनीतून हटवण्याचे षडयंत्र ? विद्रोही आदिवासी महासंघाचे मालेगाव उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन


नाशिक / केशव पवार : मालेगाव तालुक्यातील हजारो आदिवासींना बेकायदेशीररित्या त्यांच्या हक्काच्या जमिनीतून बाहेर काढण्यासाठी षडयंत्र मालेगाव तालुक्यातील प्रशासनाने चालवले असल्याचा आरोप करत विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना निवेदन देण्यात आले.


सात दिवसांच्या आत संबंधित वनहक्क धारकांना कायदेशीर न्याय न मिळाल्यास अति तीव्र स्वरूपाचे घेराव आंदोलन सुरू करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बर्डे, राज्य कार्याध्यक्ष सुभाष सोनवणे भाऊसाहेब पवार, जिल्हा अध्यक्ष अनिल अहिरे, तालुका अध्यक्ष मनोज पवार, तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब माळी, तालुका संघटक हनुमंत पवार, तालुका उपसंघटक भगवान पवार, तालुका खजिनदार रवी गायकवाड, तालुका उपखजिनदार गोरख माळी, तालुका कार्याध्यक्ष भिवराव माळी, तालुका युवा अध्यक्ष निलेश माळी, मधूकर पगारे, आबा पवार व अन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा