Breakingनाशिक : सुरगाण्यात महाराष्ट्र बंद ला सकारात्मक प्रतिसाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उस्फूर्त सहभाग !


सुरगाणा / पंडित भोंगे : सुरगाण्यात महाराष्ट्र बंद ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सुरगाणा येथे उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाबद्दल भाजपा सरकारचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला.


सुरगाणा येथील निषेध कार्यक्रमात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांनी सक्रिय सहभाग घेत भाजपा सरकारचा निषेध केला व सुरगाणा शहर तसेच संपूर्ण तालुका कडकडीत बंद केला.

या बंदाचे नेतृत्व माकपचे तालुका सचिव सुभाष चौधरी, किसान सभा जिल्हा अध्यक्ष सावळीराम पवार, सभापती इंद्रजीत गावीत, धर्मेंद्र पगारीया, वसंतराव बागुल, चिंतामण गवळी, जनार्दन भोये, राजु बाबा शेख, अकिल पठाण, संतोष बागुल, नगरसेवक सुरेशभाऊ गवळी, राहुल आहेर, भरत पवार, भास्कर जाधव, भिमाशंकर चौधरी, आनंद चौधरी, मनोहर जाधव, चिंतामण पवार, देवा हाडळ, गोपाळ सितोडा, सोमा शेवरे, परसराम गावीत आदीसह शेतकऱ्यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा