Breaking
प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात वॉईस अॉफ प्रतिभा - २०२१ स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसादपिंपरी चिंचवड : चिंचवड मधील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात २८ ऑक्टोबर रोजी "व्हॉइस ऑफ प्रतिभा - २०२१" स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला कनिष्ठ व वरिष्ठ गटातुन उत्तुंग प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व तज्ञ म्हणून नंदिन सरीन, वंदना राम लल्लू हे उपस्थित होते. या तज्ञांनी गायन  विषयावर विद्याथ्या॔ना मार्गदर्शन केले. 


स्पर्धेमधील सहभागी व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक ही केले. या स्पर्धेमध्ये कनिष्ट गटात प्रथम क्रमांक निशाद आपटे, द्वितीय क्रमांक आदित्य गांधी, तृतीय क्रमांक यश जगताप असे यश मिळाले. तर वरिष्ठ गटात सुमेध मुतालीक यांचा प्रथम क्रमांक, अवस्थी एस. द्वितीय क्रमांक, मानसी वाडकर तृतीय क्रमांक मिळाला.


या स्पर्धेकरिता संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, संस्थेचे सी.ए.ओ. डॉ.राजेंद्र कांकरिया, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, डॉ. जयश्री मुळे, डॉ. सचिन बोरगावे, डॉ. पोर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.वनिता कुऱ्हाडे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक व पालक यावेळी उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. वृषाली वाघमारे, प्रा. प्रतिभा बिराजदार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शबाना शेख यांनी करून दिला व संस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा.अर्चना गांगड यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा