Breakingपालघर : जव्हार येथील अनेकांचा भारतीय ट्रायबल पार्टीत प्रवेश !


पालघर : पालघर जिल्ह्यात भारतीय ट्रायबल पार्टी अनेकांनी प्रवेश केल्याचे पार्टीने म्हटले आहे. पालघर जिल्हा सचिव काशिनाथ भोगाडे, कल्पेश धांगटे, यांच्या नेतृत्वाखाली जव्हार येथे छोटेखानी सभेत जिल्हा अध्यक्ष, अजय कृष्णा जाधव, उपसचिव संजय घाटाल, संघटक मोहन बारकू गुहे यांनी विचार मांडले.


जिल्हा अध्यक्ष अजय जाधव यांनी केलेल्या जाहीर आवाहन आणि पक्षाची ध्येय धोरणे याला साद देते जव्हार तालुक्यातील संजय वाघ, कल्पेश धांगटे यांनी ट्रायबल पार्टी प्रवेश केला.

तसेच पुढील कार्य, पक्ष वाढीकरिता, संघटन वाढीकरिता आम्ही कटिबंध राहू, असेही वाघ म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा