Breaking

पिंपरी चिंचवड : घरकुलमध्ये ई-श्रम कार्ड, आयुष्यमान भारत योजना नोंदणी अभियानपिंपरी चिंचवड : शासकीय योजना आपल्या दारी, आरोग्य नांदो घरोघरी या अभियाना अंतर्गत घरकुल वसाहतीतील गोरगरीब, रोजंदारी, अल्पउत्पन्न गट, निराधार नागरिकांची ऑनलाइन नोंदणी अभियान भाजपच्या वतीने घरकुल परिसरात सुरू केली आहे. 


भाजपचे नेते, नगरसेवक एकनाथ पवार यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजने अंतर्गत ५ लाखाचा कॅशलेस आरोग्यविमा पात्र लाभार्थीना दिला जातो. करोना काळातील निर्बंधांमुळे ऑनलाइन नोंदणी करता येत नव्हती.२०११ च्या जनगणने मध्ये नाव असणाऱ्या नागरिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी रेशनकार्ड, आधार कार्ड आणि घरातील सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.


सर्व शासकीय योजना नोंदणी अभियानाचे व्यवस्थापक, भाजपचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष अजय पाताडे यांनी सांगितले की, देशातील असंघटित कामगार वर्गाची ऑनलाइन व्यापक नोंदणी करण्यासाठी भारत सरकारच्या वेबसाईटवर आम्ही नोंदणी करून डिजिटल ई- श्रमकार्ड देणार आहोत. यासाठी असंघटित कामगार (जेपीएफ, ईएसआयचा लाभ घेत नाहीत) मजूर, कामगार (घरकाम, सुतार, पेंटर, टेलर) रिक्षावाला, टेम्पोवाला, हात गाडी, पथारी अश्या कामगारांकरिता वर्षाला फक्त १२ रू. मध्ये दोन लाखाचा आरोग्य विमा प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये वय वर्षे १८ ते ४५ मधील कामगार, व्यापारी यांना ६० व्या वर्षानंतर ३ हजार मासिक पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो. वय वर्षे ६० पूर्ण झालेल्या नागरिकांना मोफत बस पास आणि इतर सर्व शासकीय योजनांची नोंदणी करण्यात येणार आहे.


हे अभियान मोरपंख डी २० सोसायटी पासून (सकाळी १० वा) घरकुलच्या प्रत्येक सोसायटीमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे, त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करता त्या त्या सोसायटी मधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. एक सोसायटी पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सोसायटीमध्ये हे अभियान घेण्यात येईल अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा