Breaking


पिंपरी चिंचवड : विविध मागण्यांसाठी महावितरण कंपनी कार्यालयालावर मोर्चापिंपरी चिंचवड : शहरातील भोसरी येथील महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीवर दररोज तुटणाऱ्या जून्या तारा व त्यामुळे सातत्याने खंडीत होणारा वीजपुरवठा या गोष्टीला कंटाळलेल्या शहरातील ७१  झोपडपटीतील नागरिकांनी भारतीय लहूजी पँथरच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी नगर येथून मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या.मोर्चात 'या' मागण्या करण्यात आल्या.

१) पिंपरी चिंचवड शहरातील ७१ झोपडपट्टयातील ३५ ते ४० वर्षापूर्वी असणारे जूनेखांब, विद्यूत वाहक तारा तात्काळ बदलण्यात याव्यात. 

२) बालाजी नगरसमोरील हायटेंशन विद्यूत वाहक भूमिगत टाकण्यात याव्या.

३) झोपडपटटयातील विज ग्राहकांना अंदाजे बिले दिली जातात, मीटर रिडिंग घेऊनच बिले वेळेवर देण्यात यावी.

४) करोना काळातील दिड वर्षाची झोपडीधारकाची बिले माफ करण्यात यावीत.

५) ज्या झोपडीधारकाची थकबाकीमुळे वीज मीटर काढुन नेले आहेत, त्यांची मागील थकबाकी माफ करून नवीन विजजोडणी करणेत यावी.

६) प्रत्येक झोपडीधारकाला नवीन विज कनेक्शन देण्यात यावे. तसेच मासिक वीज आकारणी फक्त २०० रू करण्यात यावी.

७) विद्युत विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायमसेवेत घेण्यात यावे या मागण्या करण्यात आल्या. 


या मोर्चात सामाजिक कार्यकर्ते सुभाष बनसोडे, बन्सी शिंदे, लक्ष्मण शिरसाठ, हरी शिदे, किसन सरवदे, रामभाऊ ओव्हाळ, महमंद शहा, प्रभाकर गायकवाड, अभिषेक कांबळे, रवि काची, माणिक खंडागळे, दयानंद कोटमाळे, प्रल्हाद कांबळे, मुन्नाभाई कुरेशी, अक्षय दुन घव, संभाजी सरवदे, सुरेश भिसे, रविंद्र कांबळे, अनिल भोसले, हनुमंत वाघमारे, सविता झोंबाडे, कोंडाबाई गायकवाड, सविता आवाड, रब्बाना शेख, रूक्मीणी वाघचौरे, नसीर शेख, आकाश शिंदे, अविनाश कवाद, भिमराव ओरसे, नंदा कांबळे इ. अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


यावेळी कार्यकारी अभियंता भोसले यांनी मोर्चासमोर येऊन निवेदन स्विकारले व आठ दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत करून जूने खांब व तारा बदलण्याचे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा