Breakingचिखलीमध्ये प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणी सप्ताह


पिंपरी चिंचवड : चिखली जाधववाडी, मोशी, कुदळवाडी प्रभागातील दारिद्र्य रेषेखालील गोर गरीब नागरिकांसाठी भारत सरकारची प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेची ऑनलाइन नोंदणी करून प्रत्येक नागरिकास शासकीय हेल्थ कार्ड देण्यासाठी चिखली जाधववाडी येथे विशेष नोंदणी सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.


नगरसेविका अश्विनी जाधव यांनी सांगितले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याखालील प्रत्येक कुटुंबासाठी ५ लाखांपर्यंत कॅशलेस आरोग्य विमा उपलब्ध करून देण्यात येते. याची नोंदणी आयुष्य मंत्रालयाच्या वेबसाईट वरून आमच्या जाधववाडी येथील कार्यालयातून दि.१३ ऑक्टोबर पासून सुरू करत आहोत. परिसरातील महिला घरकामगार, विधवा, निराधार, परितक्त्या, अपंग आणि स्थलांतरित, रोजंदारी श्रमिकांना याचा लाभ मिळवून देणार आहोत. या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील सर्व गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा प्रदान करेल. याचा अर्थ असा की या योजनेस पात्र असणारी कोणतीही गरीब व्यक्ती खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकते.


या योजनेचे संयोजक युवा नेते संतोष जाधव यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक आरोग्य योजनेची माहिती गरिबांना नसते, त्यामुळे ते मोफत आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात. या योजनेची नोंदणी करताना आधारकार्ड, फोटो, रेशनकार्ड आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना नोंदणी केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा