Breaking


प्रहार जनशक्ती पक्षाची नाशिक मध्ये विविध ठिकाणी विभागीय आढावा बैठक संपन्नचांदवड (सुनिल सोनवणे) : आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकांची रणनीती पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात नेऊन जनतेच्या कामातून पक्ष वाढीसाठी व पक्ष संघटना मजबूत करणे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंगरूळ ता. चांदवड येथे रेणुका इव्हेंट हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.


यावेळी नाशिक जिल्ह्यातील प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते प्रहार सैनिक व तालुक्यातील शाखा प्रमुख उपस्थित होते. यामध्ये प्रमुख उपस्थिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, उपजिल्हा अध्यक्ष गणेश निंबाळकर, चांदवड तालुका प्रहार मार्गदर्शक सुरेश तात्या उशीर, प्रहार जनशक्ती पक्ष चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, प्रहार शेतकरी संघटना चांदवड तालुका प्रमुख राम बोरसे, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख चंद्रभान गांगुर्डे उपस्थित होते.


यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. तसेच गणेश निंबाळकर यांनी पुढील रणनीतीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी पक्षीय फेरबदल व संघटना वाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील असावे असेही यावेळी निंबाळकर यांनी सांगितले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे होते, प्रसंगी अध्यक्षीय भाषणात गावंडे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका पार पडत आहे परंतु नाशिक जिल्ह्यात चांदवड तालुक्यात गणेश निंबाळकर यांचे काम अतिशय तळमळीचे व धडाडीचे आहे. त्यामुळे आगामी निवडणूक काळात खास करुन आमचे लक्ष चांदवड तालुका असणार व निंबाळकर यांच्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु जास्तीत जास्त वेळ आम्ही राज्यमंत्री बच्चू कडू लक्ष देतील असे यावेळी म्हणाले. प्रसंगी कार्यक्रमात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी दिसला.


यावेळी उपस्थितांमध्ये येवला तालुका प्रमुख हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे, किरण चरमळ, सटाणा तालुका प्रमुख गणेश काकुळते, नांदगाव तालुका प्रमुख संदीप सूर्यवंशी, जनार्धन पगार, गणेश शेवाळे, हरिसिंग ठोके, कृष्णा जाधव, वसंत झांबरे, सुनील पाचपुते, रेवन गांगुर्डे, शिवा गुंजाळ, गणेश तिडके, कैलास पगार, संदीप महाराज गांगुर्डे, साहेबराव गांगुर्डे, संदीप देवरे, बापू भोकनळ, पोपट भोकनळ, कुणाल घोरपडे, कारभारी गांगुर्डे, वैभव गांगुर्डे, अनिल पवार, सचिन दुघडे, गौरव पवार, चंद्रकांत जाधव, रवि नामदास, पिंटू तिडके, दीपक चव्हाण, उत्तम खांदे, कैलास खांदे, गणेश गांगुर्डे, व असंख्य प्रहार सैनिक शाखाप्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम बोरसे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा