Breaking


पुणे : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा


हडपसर / डॉ. अतुल चौरे : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयातील मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभागामार्फत 'वाचन प्रेरणा दिनाचे' औचित्य साधून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी घरी एक तास वाचन करण्याचा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासली जाईल. तसेच नवीन येणाऱ्या पिढीसमोर वाचनाचा आदर्श निर्माण होईल. अशी भावना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केली. 


या उपक्रमात महाविद्यालयातील शुभम शेंडे, मानसी गिरम, मुसैब शेख, जय दुधाळ, निलेश सोनावणे, प्रा.स्वप्निल ढोरे, डॉ. संदीप वाकडे, डॉ. नम्रता मेस्त्री याबरोबरच महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. 

या उपक्रमासाठी  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. संजय जडे, आय. क्यू. ए. सी. विभागाचे चेअरमन डॉ. किशोर काकडे यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे संयोजन मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे, सांस्कृतिक विभागप्रमुख  डॉ.शिल्पा शितोळे, ग्रंथपाल डॉ.शोभा कोरडे व डॉ.अतुल चौरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा